माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी रविवारी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईचे माजी खासदार असून ही जागा ठाकरे गटाला जाणार हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी आता शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला. मिलिंद देवरा यांच्यासोबत काँग्रेसच्या दहा माजी नगरसेवकांनाही शिंदे गटामध्ये प्रवेश केला.
माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सहकार्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना शिवसेनेतील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी… pic.twitter.com/VsNEzZSiNT
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 14, 2024
मिलींद देवरांसह शिंदे गटात कोणाकोणाचा प्रवेश झाला?
- सुशिबेन शहा, राज्य महिला आयोग, माजी अध्यक्ष
- प्रमोद मांद्रेकर , माजी नगरसेवक
- सुनिल नरसाळे, माजी नगरसेवक
- रामवचन मुराई , माजी नगरसेवक
- हंसा मारु, माजी नगरसेवक
- अनिता यादव, माजी नगरसेविका
- रमेश यादव
- गजेंद्र लष्करी, माजी नगरसेवक
- प्रकाश राऊत- जनरल सेक्रेटरी मुंबई कॉग्रेस
- सुशिल व्यास , मारवाडी संमेलन अध्यक्ष
- पुनम कनोजिया
- संजय शहा, डायमंड मर्चंट, जैन सेवा संघ- अध्यक्ष
- दिलीप साकेरिया – मुंबई काॅग्रेस राजस्थानी सेल- अध्यक्ष
- हेमंत बावधनकर- निवृत्त पोलिस अधिकारी
- राजाराम देशमुख, सचिव- मुंबई कॉग्रेस – विश्वस्त सिद्धीविनायक मंदीर
- त्रिंबक तिवारी- सेक्रेटरी, मुंबई कॉग्रेस कमिटी
- कांती मेहता- ऑल इंडीया जैन फेडरेशन अध्यक्ष
- 85 वर्षीय काॅग्रेसचे कार्यकर्ते जवाहरभाई मोतीचंद यांचा शिंदे गटात प्रवेश
मिलिंद देवरा यांच्यासोबत जैन, मारवाडी, मुस्लीम समाजाचे १० माजी नगरसेवक, २० पदाधिकारी आणि ४५० हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. https://t.co/c8E2aS0BXH pic.twitter.com/kLDy3QJ4Xa
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 14, 2024