IRE vs NZ: वयाच्या 31 व्या वर्षी पदार्पण, पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक; विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडला मिळाला घातक गोलंदाज

WhatsApp Group

न्यूझीलंडने आयर्लंडचा (IRE vs NZ 2nd T20) दुसऱ्या T20 मध्ये 88 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. डॅन क्लीव्हर आणि मायकेल ब्रेसवेल हे किवी संघाच्या या विजयाचे हिरो ठरले. क्लीव्हरने 55 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 78 धावांची खेळी केली, तर ब्रेसवेलने हॅट्ट्रिक घेत यजमानांचे काम पूर्ण केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 179 धावा केल्या. या धावसंख्येसमोर आयर्लंडचा संपूर्ण संघ 91 धावांत गारद झाला.

मायकेल ब्रेसवेलने आयर्लंडच्या संपूर्ण संघाला गारद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मायकेल ब्रेसवेलने त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच षटकात हॅटट्रिक विकेट घेतली. T20 मालिकेत अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. दुसऱ्या सामन्याच्या 14व्या षटकात न्यूझीलंडचा कर्णधार सेंटनर ब्रेसवेलकडे चेंडू सोपवला. आयर्लंडच्या फक्त तीन विकेट शिल्लक होत्या. पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर एक धाव दिल्यानंतर ब्रेसवेलने तिसऱ्या चेंडूवर मार्क एडरला बाद केले.

षटकाच्या चौथ्या चेंडूवर मायकल ब्रेसवेलने बॅरी मॅकार्थीला बाद केले. त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला मात्र तोही झेलबाद झाला. यानंतर 10 नंबरचा फलंदाज क्रेग यंगही ब्रेसवेलचा बळी ठरला. अशाप्रकारे ऑफस्पिनर ब्रेसवेलने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय षटकात हॅट्ट्रिक विकेट घेत इतिहास रचला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ब्रेसवेलने न्यूझीलंडकडून T20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यात त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही पण बॅटने 13 चेंडूत 21 धावा केल्या.

T20मध्ये न्यूझीलंडसाठी हॅट्ट्रिक घेणारे गोलंदाज

जेकब ओरम 2009
टिम साउथी 2010
मायकेल ब्रेसवेल 2022*