Mia Khalifa Viral Video: “हे सगळं कधी थांबणार?”; लेबनॉनमधील रक्तपाताने मिया खलिफाला कोसळले रडू, व्हिडिओ शेअर करत मांडली व्यथा

WhatsApp Group

Mia Khalifa Crying Video

वॉशिंग्टन/बेरूत: अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी युद्धबंदी (सीझफायर) जाहीर झाली असली, तरी लेबनॉनच्या भूमीवर मात्र रक्ताचा सडा पडणे थांबलेले नाही. या भीषण युद्धाच्या आगीत होरपळणाऱ्या लेबनॉनची स्थिती पाहून प्रसिद्ध लेबनानी-अमेरिकन मीडिया व्यक्तिमत्व मिया खलिफा अत्यंत भावूक झाली आहे. मियाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात ती ढसाढसा रडताना दिसत आहे. युद्धाचा हा विदारक अनुभव सांगताना मियाने उपस्थित केलेला “हे सगळं कधी थांबणार?” हा प्रश्न सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

डोळ्यादेखत हल्ले आणि भयावह वास्तव

व्हायरल व्हिडिओमध्ये मिया खलिफाने युद्धातील भयानक परिस्थितीचे वर्णन केले आहे. ती म्हणते, “हे दृश्य पाहणे अत्यंत वेदनादायक आहे. सोशल मीडियावर येणारे फोटो आणि व्हिडिओ पाहून मन सुन्न होते. एकाच दिवसात अवघ्या काही मिनिटांत शेकडो हल्ले झाले आहेत. शाळा, रुग्णालये आणि रहिवासी भागांना लक्ष्य केले जात आहे. हे सर्व थांबण्याचे नाव घेत नाहीये.” मियाच्या डोळ्यातील अश्रू लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या मानवी संहाराची भीषणता जगासमोर मांडत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mia K. (@miakhalifa)

व्हिडिओ पोस्ट करताना मियाने अत्यंत आक्रमक भाषेत अमेरिका आणि इजराइलवर टीका केली आहे. तिने या दोन्ही देशांना ‘दहशतवादी’ आणि ‘फॅसिस्ट’ राज्ये म्हटले आहे. मियाच्या मते, हे युद्ध गुन्हे आहेत आणि एक दिवस या दोन्ही देशांविरुद्ध ‘हेग’ येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटले चालवले जातील. सीझफायरच्या अटींना केराची टोपली दाखवून ज्या प्रकारे हिंसाचार सुरू आहे, त्याबद्दल तिने संताप व्यक्त केला आहे.

लेबनॉनमध्ये एका दिवसात २५४ मृत्यू

सीझफायरचा करार होऊन काही तास उलटत नाही तोच इजराइलने लेबनॉनवर आतापर्यंतचा सर्वात भीषण हवाई हल्ला केला. लेबनॉनच्या नागरी संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बेरूत, बेका व्हॅली आणि दक्षिण लेबनॉनमध्ये झालेल्या या हल्ल्यात आतापर्यंत २५४ लोकांचा मृत्यू झाला असून १,१०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. शांततेच्या दाव्यांखाली सुरू असलेल्या या नरसंहारामुळे संपूर्ण आखाती देशात दहशतीचे वातावरण पसरले आहे.