MI Vs CSK: चेन्नईचा मुंबईवर 20 धावांनी विजय
IPL 2024 MI vs CSK: आयपीएल 2024 च्या 29 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 207 धावांचे लक्ष्य होते, परंतु हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 186 धावा करता आल्या. अशाप्रकारे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने 20 धावांनी सामना जिंकला. मात्र, मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने शानदार शतक झळकावले. रोहित शर्माने 63 चेंडूत 105 धावांची खेळी केली. या फलंदाजाने आपल्या झंझावाती खेळीत 11 चौकार आणि 5 षटकार ठोकले, पण मुंबई इंडियन्सचा पराभव टाळू शकला नाही.
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात चांगली झाली नसली तरी शेवटी त्यांनी चांगली कामगिरी केली. अजिंक्य रहाणे दुसऱ्याच षटकात 5 धावा काढून बाद झाला. पण, त्यानंतर रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. त्यानंतर रचिन 21 (16) धावांवर बाद झाला. पण, त्यानंतर गायकवाड आणि शिवम दुबे यांच्यात 90 धावांची भागीदारी झाली, ज्याने चेन्नईचा डाव वेगाने पुढे नेला. कर्णधार ऋतुराज 40 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 69 धावा करून बाद झाला. डॅरिल मिशेल 14 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या महेंद्रसिंग धोनीने चांगली फटकेबाजी केली. त्याने सलग 3 चेंडूत 3 षटकार मारले आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावा केल्या. अशा प्रकारे माहीने केवळ 4 चेंडूत 500 च्या स्ट्राईक रेटने 20 धावा केल्या.
A solid fight but a tough night.#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #MIvCSK pic.twitter.com/hOuidrq2tN
— Mumbai Indians (@mipaltan) April 14, 2024
मुंबई इंडियन्स फलंदाजी करताना रोहित शर्माला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. टिलक वर्माने 20 चेंडूत 31 धावांची खेळी खेळली. तर इशान किशनने 15 चेंडूत 23 धावा केल्या. सूर्यकुमार यादव एकही धाव न काढता बाद झाला. याशिवाय टीम डेव्हिड आणि रोमारिया शेफर्डसारख्या फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ लक्ष्यापासून 20 धावा दूर राहिला.
शतक शर्मा 🔥💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #MIvCSK pic.twitter.com/905VtfHueS
— Mumbai Indians (@mipaltan) April 14, 2024
चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे तर, पाथीराना हा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. पाथीरानाने 4 षटकात 28 धावा देत 4 खेळाडूंना आपला बळी बनवले. याशिवाय तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. चेन्नई सुपर किंग्जचे 6 सामन्यांत 8 गुण झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सची 6 सामन्यांत 4 गुणांसह आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. या सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याचा संघ सातव्या स्थानावर होता.