वाढत्या महागाईमुळे कित्येक नागरिकांचे स्वप्न अधुरेच राहिले जाते. शहरात आपलं छोटस का होईना हक्काचं घर असावं असं प्रत्येक नागरिकाला वाटत असते. मात्र सर्वसामन्यांचं हे स्वप्न साकार होणं शक्य नाही. अशावेळी सर्वसामान्य नागरिक म्हाडाचे घर खरेदी करण्यास (MHADA Lottery) प्राधान्य देत असतात.
कोकणवासियांसाठी म्हाडाचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न आता अंतिम टप्प्यामध्ये आलं आहे. मागील काही महिने लांबणीवर पडलेला सोडत काढण्यासाठीची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ठाण्यामध्ये 24 फेब्रुवारी दिवशी सोडत काढली जाणार आहे. कोकण विभागातील सुमारे 5311 घरांसाठीची सोडत जाहीर केली जाणार आहे. यासाठी 24 हजारापेक्षा अधिक अर्ज आले आहेत. कोकण विभागातील घरांसाठी सोडत 3 वेळा तारीख देऊनही मागे-पुढे झाली होती. प्रशासकीय कारण देत म्हाडाने ही सोडत पुढे ढकलली होती पण आता 24 फेब्रुवारीला अखेर ती सोडत जाहीर केली जाणार आहे.
कोकण विभागामध्ये 5311 घरांसाठी 15 सप्टेंबरपासून अर्जाची खरेदी विक्री आणि अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. 17 नोव्हेंबर पर्यंत या प्रक्रियेमध्ये 31433 जणांनी अर्ज सादर केले. अनामत रक्कमेसह अर्ज सादर करणारे 24303 जण पात्र ठरले आहेत. आता ही प्रक्रिया पूर्ण झाली असून म्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी सज्ज झाले आहे. ही सोडत 7 नोव्हेंबरला होणार होती. पण कोकण मंडळाने अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ दिल्याने 7 नोव्हेंबरची सोडत पुढे ढकलून 13 डिसेंबरला सोडत काढण्याचे मंडळाने त्यावेळी जाहीर केले होते. मात्र ती तारीख देखील बदलण्यात आली.
घरांसाठी सोडत जाहीर केल्यानंतर भाग्यवान विजेत्यांची यादी प्रसिद्ध जाईल. घर ज्यांना जाहीर झाले आहे त्यांना SMS द्वारा निकाल कळवला जातो. म्हाडाच्या वेबसाईट वर निकालाच्या संध्याकाळी प्रतिक्षायादी देखील जाहीर होते. MHADA Lottery Result