MH CET Update: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता पदवी प्रवेशासाठी सीईटीसोबत 12वीचे गुणही महत्त्वाचे

WhatsApp Group

MH CET Exam Update: उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा MHT CET 2022 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी स्वत: याबाबद ट्वीट करून माहिती दिली होती. मात्र आता या परीक्षेमध्ये राज्य शिक्षण मंडळाने काही महत्त्वाचे बदल (Important Changes) केले आहेत. त्यानुसार आता पदवीच्या शिक्षणासाठी (Degree Education) सीईटीच्या गुणांसोबतच बारावी बोर्ड परीक्षेत (12th Board Exam) मिळालेले गुण देखील ग्राह्य धरले जाणार आहेत. यामुळे बारावीच्या मार्कांचे महत्वं वाढणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.

पदवीच्या शिक्षणासाठी (Graduation) आतापर्यंत विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये मिळालेल्या गुणांवरून (CET marks) प्रवेश देण्यात येत होता. परंतु आता बोर्डाचे 50 टक्के आणि सीईटीचे 50 टक्के अशा एकूण गुणांच्या आधारावर पदवी शिक्षणासाठी प्रवेश (Graduation Admission ) दिला जाणार आहे. यामुळे बारावीच्या गुणांना महत्व प्राप्त होणार आहे.

सीईटीच्या गुणांच्या आधारावर होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवेशांसाठी हा नियम लागू असणार आहे. यासोबत अतिशय महत्त्वाचा बदल म्हणजे पुढील वर्षापासून एमएचटी-सीईटीचा (MHT CET) निकाल नियमितपणे 1 जुलै रोजी जाहीर करण्यात येईल आणि त्यानंतर 1 सप्टेंबरपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होईल अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.