गणेशोत्सवात पुण्यात मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मेट्रो धावणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

WhatsApp Group

19 सप्टेंबर रोजी देशभरात गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जाणार आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेश उत्सव मंडळांची बैठक घेतली. गणपती मंडळांना वेळेवर मिरवणूक काढण्याची विनंती केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यासोबतच यंदाच्या गणेशोत्सवात पुणे मेट्रो मध्यरात्री 12 वाजेपर्यंत धावणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. त्याचबरोबर दगडूशेठ गणेश विसर्जनासाठी 4.30 वाजता मिरवणूक निघणार असल्याचे सांगण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गोविंदा पथकांना दहीहंडीदरम्यान काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यंदाचा गणेशोत्सव थाटामाटात साजरा करणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, पोलीस प्रशासनही यासाठी सज्ज असेल. चंद्रकांत पाटील यांच्यावरील असंतोषाच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, चंद्रकांत दादांना जाणूनबुजून बोलावले गेले नाही असे नाही. कधीकधी आपल्या वेळा जुळत नाहीत. पण आम्ही सगळे मिळून काम करतो. मुख्यमंत्री आणि आमच्यात समन्वय आहे. पुणेकरांनी हा सण चांगल्या पद्धतीने साजरा करावा, यासाठी आज ही बैठक होत आहे.

अजित पवार यांचा विरोधकांना सवाल 

राष्ट्रीय अध्यक्षाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “मला माझ्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष बनवले आहे, त्यामुळे मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे.’ विरोधकांवर खरपूस समाचार घेत अजित पवार म्हणाले, “मी सभा घेतली तर मला सात दिवसांत निकाल लागतो, पण त्यांनी सभा घेतल्या तर दोन महिने निकाल दिसत नाहीत.