‘रामनाथ कोविंद यांनी भाजपचा अजेंडा पूर्ण केला’, मेहबुबा मुफ्ती यांनी माजी राष्ट्रपतींवर साधला निशाणा

WhatsApp Group

द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. त्यांनी शपथ घेतल्यानंतर आता जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्यांनी ट्विट करत रामनाथ कोविंद यांच्यावर निशाणा साधला आहे, ‘कलम 370 असो, नागरिकत्व कायदा असो किंवा अल्पसंख्याकांना किंवा दलितांना लक्ष्य करणे असो. रामनाथ कोविंद यांनी नेहमीच भारतीय संविधानाच्या नावाखाली भाजपचा राजकीय अजेंडा पूर्ण केला आहे. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, राम नाथ कोविंद यांनी एक असा वारसा सोडला आहे जिथे भारतीय संविधानाला अनेकदा चिरडले गेले आहे. असं ट्वीट मेहबुबा मुफ्ती यांनी केलं आहे.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री अनेकदा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजपवर हल्लाबोल करत आहेत. याआधी त्यांनी ‘हर घर तिरंगा अभियान’वर निशाणा साधला होता.

त्याचबरोबर जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांसारख्या नेत्यांच्या रक्त आणि घामाने हा देश उभारला गेला आहे, ज्याचा आधार लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता होता, भाजप याच्या उलट करत आहे, असे मुफ्ती म्हणाले होते. यापेक्षा भ्रष्ट सरकार मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नाही.मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा किंवा महाराष्ट्रात भाजपचे ज्याप्रकारे घोडेस्वार आमदार आहेत, त्यापेक्षा मोठे भ्रष्टाचाराचे उदाहरण इतिहासात नाही.