
CAPF Recruitment 2022: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) येत्या काही दिवसांत मेगाभरती केली जाणार आहे. सध्या CAPF मध्ये 84,405 पदे रिक्त असून ही सर्व पते 2023 पर्यंत भरण्याची योजना सरकारने तयार केली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) यांनी ही सर्व पदे डिसेंबर 2023 पर्यंत भरण्याची सरकारची योजना (SSC CAPF Recruitment 2022) असल्याची माहिती संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.
याबाबत बोलताना त्यांनी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील स्वीकृत पदांची संख्या 10,05,779 आहे, त्यापैकी 84,405 पदे रिक्त (CAPF Vacancy 2022) आहेत अशी माहिती दिली. तसेच सरकार आता BSF, CAPF, CISF, ITBP, SSB मधील रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक पावले उचलत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संसदेत केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिलेल्या माहितीनुसार 6 केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये एकूण 84,405 पदे रिक्त आहेत. त्यापैकी केंद्रीय राखीव पोलिस दलात सर्वाधिक 29,985 पदे आहेत. बुधवारी सरकारकडून राज्यसभेत ही माहिती देण्यात आली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार आसाम रायफल्समध्ये 9659 पदे, बीएसएफमध्ये 19254, सीआयएसएफमध्ये 10918, सीआरपीएफमध्ये 29985 आणि ITBPमध्ये 3187, एसएसबीमध्ये 11402 पदे रिक्त आहेत.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार असम राइफल्समध्ये 65520 स्वीकृत पदे असून 9659 पते रिक्त आहेत. बीएसफ 265277 स्वीकृत पदे तर 19254 पदे रिक्त आहेत. सीआईएसफ 164124 स्वीकृत आणि 10918 रिक्त पदे आहेत. सीआरपीएफ स्वीकृत पदे 324654 तर रिक्त पदांची संख्या 29985 एवढी आहे. याशिवाय आईटीबीपी स्वीकृत पदे 88430 आणि 3187 रिक्त पदे आहेत. एसएसबी मध्ये 97774 स्वीकृत तर 11402 रिक्त पदे असून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातीलत एकूण स्वीकत पदांची संख्या 1005779 असून त्यापैकी 84405 पदे रिक्त आहे. हे रिक्त असलेले सर्व पदे डिसेंबर 2023 पर्यंत भरले जाणार आहेत.