राज्य सरकारची मोठी घोषणा; राज्यात होणार तब्बल 10 हजार जागांसाठी मेगाभरती

WhatsApp Group

सरकारी नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य सरकारकडून एक मोठी खुशखबर आली आहे. राज्य सरकार लवकरच येत्या काही महिन्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये तब्बल 10 हजार जागांसाठी मेगाभरती होणार आहे अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून देण्यात आली आहे.

गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली होती. काही ठिकाणी परीक्षाही रद्द कराव्या लागल्या. गैरव्यवहार झाला होता. मात्र यंदाही तसंच काही होऊ नये असं उमेदवाराचं म्हणणं आहे.

भरतीचं वेळापत्रक

1 जानेवारी – 7 जानेवारी – भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल.
25 जानेवारी – 30 जानेवारी – उमेदवारांच्या अर्जाची छाननी
31 जानेवारी – 2 फेब्रुवारी – पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.
25 मार्च – 26 मार्च – विविध पदांसाठी भरती परीक्षा
27 मार्च – 27 एप्रिल – या कालावधीत उमेदवारांची निवड केली जाईल.