‘आरोग्या’लाही बसणार महागाईचा भडका; 1 एप्रिल पासून औषधांच्या किमती वाढणार!

WhatsApp Group

सततच्या महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य लोकांचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. सतत या नाही तर त्या वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे. महागाई थांबायचे नाव घेत नाहीये. या महिनाभरामध्ये दूध (Milk Price Hike), गॅस सिलेंडर (Gas Cylinder Price Hike), पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price Hike) यांचे दर चांगलेचं वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता चिंतेत आली आहे. ही दरवाढ होत नाही तोवर आता सर्वसामान्य जनतेला आणखी एक धक्का बसणार आहे.

आता औषधांच्या किमती (Medicine Price) देखील वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या काही काळात सर्वसामान्यांना जगणं मुश्किल होणार आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीचे सत्र सुरुच, आज पेट्रोल आणि डिझेल 81 पैशांनी महागले आहे.

पेन किलर, अँटीबायोटिक्स (Antibiotics), अँटी-व्हायरससह (Anti-Virus)अशा अनेक औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून वाढणार आहेत. सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता औषधांच्या किमतीमध्ये देखील वाढ होणार आहे. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. कारण आजारी पडल्यानंतर बरं होण्यासाठी लागणारी औषधे महागणार असल्यामुळे त्याचा थेट परिणाम घराच्या बजेटवर होणार आहे.

भारताच्या औषध किंमत प्राधिकरणाकडून शुक्रवारी औषधांच्या किमतींमध्ये 10.7 टक्के वाढ करण्याची परवानगी देण्यात आली आहे.नॅशनल लिस्ट ऑफ एसेंसियल मेडिसिनच्या (NLIM) अंतर्गत एप्रिलपासून 800 हून अधिक औषधांच्या किमती वाढणार आहेत. या औधषांच्या किमती दोन टक्क्यांनी वाढू शकतात.