T20 World Cup 2022: रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य, म्हणाले- मीडियाने विराट कोहलीवर दबाव आणला, पण…

WhatsApp Group

T20 World Cup 2022: मेलबर्नमध्ये भारताने पाकिस्तानवर 4 विकेट्सने मात केली. भारतीय संघाच्या विजयाचा हिरो होता विराट कोहली. माजी भारतीय कर्णधाराने 53 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. आता भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीवर मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, मीडिया आणि टीकाकारांनी विराट कोहलीवर खूप दबाव आणला होता, परंतु मला माहीत होते की विराट लवकरच जोरदार पुनरागमन करेल.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, मला विराट कोहलीच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे, पण मीडिया आणि टीकाकारांनी या खेळाडूवर खूप दबाव टाकला. त्याचवेळी रवी शास्त्री म्हणाले की, विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शानदार खेळी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता त्याने आपल्या कामगिरीने सर्वांची तोंडे बंद केली आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावा करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. याशिवाय हार्दिक पांड्याने 37 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले.

T20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाचा दुसरा सामना नेदरलँड्सशी होणार आहे. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील हा सामना 27 ऑक्टोबर रोजी सिडनी येथे होणार आहे. भारत आणि नेदरलँड यांच्यातील सुपर-12 फेरीचा हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता सुरू होईल. भारतीय चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. याशिवाय चाहत्यांना डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.