दक्षिण मेक्सिकोमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून, या शहराच्या महापौराने एका मादी मगरीशी लग्न केले आहे. वास्तविक, दक्षिण मेक्सिकोतील सॅन पेड्रो हुआमेलुला शहराचे महापौर व्हिक्टर ह्यूगो सोसा यांनी हे केले आहे. स्थानिक रिपोर्ट्सनुसार, सोसाने हे 230 वर्ष जुन्या विवाह प्रथेनुसार केले आहे, त्यानंतर तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
एएफपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, व्हिक्टर ह्यूगो सोसा जेव्हा कार्यक्रमस्थळी दाखल झाले तेव्हा त्यांच्या हातात मगर होती. या मादी मगरीला वधूप्रमाणे तयार करण्यात आले होते. त्यामुळे हजारो लोकांच्या उपस्थितीत महापौरांनी या मगरीशी विवाह केला.
मगरीशी लग्न केल्यानंतर महापौर म्हणाले
न्यूज एजन्सी एएफपीच्या वृत्तानुसार, महापौरांनी एलिसिया अॅड्रियाना नावाच्या मगरीला पत्नी म्हणून स्वीकारले. सोसा यांनी मगरीशी लग्न करताना सांगितले की, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो म्हणून मी जबाबदारी स्वीकारत आहे. ते पुढे म्हणाले की, प्रेमाशिवाय तुम्ही लग्न करू शकत नाही.
The mayor of Mexico’s San Pedro Huamelula married a crocodile as part of a ritual to usher in a good harvest pic.twitter.com/JYByIWYbRb
— Reuters (@Reuters) July 2, 2023