आयपीएल २०२२ साठी IPL 2022 पंजाब किंग्जचा कर्णधार Punjab Kings निश्चित झाला आहे. पंजाबचा मागील सिझनमधील कर्णधार केएल राहुल KL Rahul यंदा लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याच्या रिक्त जागेवर आता राहुलचा मित्र मयंक अग्रवालची Mayank Agarwal नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएल ऑक्शनमध्ये IPL Auction 2022 पंजाबने शिखर धवनला Shikhar Dhawan खरेदी केले आहे. त्याच्या नावाचीही कर्णधार म्हणून चर्चा होती.
मयंक अग्रवालची मागील दोन आयपीएल सिझनमध्ये जोरदार कामगिरी झाली आहे. त्याने आयपीएल २०२१ मधील १२ सामन्यांमध्ये ४४१ तर आयपीएल २०२० मधील ११ सामन्यांमध्ये ४२४ रन केले होते. या कामगिरीमुळेच मयंकला आगामी सिझनसाठी पंजाबने रिटेन केले होते. पंजाबने सोमवारी ट्विट करत कर्णधार म्हणून त्याच्या नावाची घोषणा केली आहे.
???? Attention #SherSquad ????
Our ????© ➜ Mayank Agarwal
Send in your wishes for the new #CaptainPunjab ????#SaddaPunjab #PunjabKings #TATAIPL2022 @mayankcricket pic.twitter.com/hkxwzRyOVA
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) February 28, 2022
आयपीएल ऑक्शनमध्ये पंजाबने शिखर धवन, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो तससेच लियाम लिविंगस्टोन या प्रमुख खेळाडूंना खरेदी केले आहे. मयंकची टी-20 क्रिकेटमधील कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने १५९ इनिंगमध्ये २६ च्या सरासरीने ३९१७ रन केले आहेत. यात २ शतक आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राईक रेट १३५ आहे. मयंक भारतीय संघाकडून आजवर १९ टेस्ट आणि ५ वन-डे सामने खेळला आहे. त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये द्विशतक आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावले आहे.