IND vs ENG: रोहित शर्माच्या जागी ‘या’ धडाकेबाज फलंदाजाची अचानक एंट्री

WhatsApp Group

IND vs ENG : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. जिथे भारतीय संघाला 1 कसोटी, 3 वनडे, 3 टी-20 सामने खेळायचे आहेत. मात्र त्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. कारण संघाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. जर रोहित शर्मा 1 जुलैच्या सामन्यापूर्वी तंदुरुस्त न झाल्यास त्याच्या जागी मयंक अग्रवालला संधी दिली जाईल. मयंक भारतीय संघात बॅकअप खेळाडू म्हणून सामील होणार आहे. ज्यासाठी मयंक आज इंग्लंडला रवाना झाला आहे.

लिसेस्टरशायर क्लबविरुद्धच्या सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित फलंदाजीला आलाच नाही. त्यानंतर सायंकाळी बीसीसीआयने ट्विट करून सांगितले की, रोहितचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 25 जूनला रोहितची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली, त्यानंतर रोहित आता पाच दिवस विलगिकरणार राहणार आहे. 30 जूनला त्याची दोन वेळा RT-PCR चाचणी करण्यात येईल आणि ती निगेटिव्ह आल्यानंतरच त्याला खेळता येणार आहे. भारताच्या अन्य खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

कर्णधार रोहित शर्मा वेळेत तंदुरुस्त न झाल्यास शुबमन गिलसह सलामीसाठी तीन पर्याय सध्याभारतीय संघाकडे आहेत. केएस भरत, हनुमा विहारी आणि चेतेश्वर पुजारा यापैकी एक गिलसह पाचव्या कसोटीत ओपनिंगला येऊ शकतो. मयांकला बॅक अप म्हणून बोलावले गेले आहे.

भारताचा संघ – रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा, मयांक अग्रवाल