
नाशिक – नाशिकची महिला क्रिकेटपटू माया सोनवणेची महिला टी-20 चॅलेंज 2022 स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. टी-20 चॅलेंज स्पर्धेचे सर्व सामने 23 ते 28 मे या कालावधीत महाराष्ट्र असोसिएशनच्या गहुंजे, पुणे येथील स्टेडियमवर खेळवण्यात येणार येतील. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया तसेच भारतातील क्रिकेटपटू सहभागी होतील.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयतर्फे (BCCI) आयोजित लालभाई स्टेडीयम, सूरत येथे नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत अंतिम सामन्यामध्ये नाशिकच्या माया सोनवणेने रेल्वे विरुद्ध 2 बळी घेतले.
याआधी पुदुचेरी (padduchery) येथे झालेल्या साखळी सामन्यामध्ये देखील प्रभावी कामगिरी करताना माया सोनवणेने (maya sonawane) आंध्र व केरळ विरुद्ध 4/4 बळी घेतले होते. अशा प्रकारे आपल्या प्रभावी लेग स्पिन गोलंदाजीने मायाने या वरिष्ठ महिला टी-20 स्पर्धेत एकूण 11 बळी घेत आपली छाप उमटविली.
2014-15 तसेच 2017-18 च्या हंगामात 23 वर्षाखालील महिलांच्या स्पर्धेमध्ये मायाने भारतामध्ये सर्वाधिक 15 गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. पुदुचेरी येथे झालेल्या 23 वर्षाखालील टी-ट्20 सामन्यांच्या स्पर्धेत 2018-19 मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना तिने चांगली कामगिरी केली होती.