
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला बाद ठरवल्यामुळं डीआरएस प्रणालीवर शंका उपस्थित होत असतानाच, पुन्हा असाच काहीसा प्रकार गुजरात टायटन्सचा फलंदाज मॅथ्यू वेडच्या (Matthew Wade) बाबतीत घडला आहे. मुंबईत बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यामध्ये मॅथ्यू वेडला पायचीत घोषित करण्यात आले.
मात्र, बॅटला कड लागून गेल्याचं वेड याला वाटत होते. चेंडू बॅटची कड घेऊन गेला असतानाही अल्ट्रा एजमध्ये बॅटचा संपर्क झाला नसल्याच दिसून आलं आणि वेडला बाद घोषित करण्यात आले. या निर्णयामुळं वेडनं तीव्र नाराजी व्यक्त केली. ड्रेसिंग रुममध्ये (Cricket dressing room) गेल्यानंतरही त्याला राग आवरता आला नाही. त्यानं हेल्मेट फेकून दिला. त्यानंतर हातातील बॅटही आपटली. हा सगळा त्याचा त्रागा कॅमेऱ्यामध्ये टिपला गेला.
#RCBvGT
Matthew Wade reaction in dugout ???? pic.twitter.com/IRaCB0XJqz— Anmol Dixit (@AnmolDi59769126) May 19, 2022
संघाच्या २१ धावा असतानाच, गुजरातला मोठा धक्का बसला. गिलने फक्त एक धाव केली. त्यानंतर मैदानात आलेल्या मॅथ्यू वेडनं चांगली सुरूवात केली. वेड आत्मविश्वासाने फटकेबाजी करत होता. चांगली धावसंख्या उभारेल असे वाटत असतानाच, मॅक्सवेलच्या षटकात त्याला पायचीत घोषित करण्यात आले. मात्र, बॅटची कड घेऊन चेंडू पायावर आदळला असं वेडला वाटळे. त्याने डीआरएस घेतला. मात्र अल्ट्रा एड्जमध्ये बॅटला चेंडूची कड लागली नसल्याचे दिसले आणि तिसऱ्या पंचांनीही वेडला बाद दिले.