
मथुरा – मथुरेमध्ये (Mathura) एक धक्कादायक (shocking incident)घटना घडली आहे. येथील नौझील परिसरामध्ये नववधूची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आलीआहे. वरमाळाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर वधू खोलीत बसली असताना ही घटना घडली.
रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. एकतर्फी प्रेमातून (one sided love) एका तरुणाने वधूवर गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आरोपी फरार झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
वधूचे वडील खुबीराम प्रजापती यांनी सांगितले की, अज्ञात आरोपींनी गोळी झाडली जी वधूच्या डोळ्याला लागली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.