GT vs KKR: पावसामुळे सामना रद्द, गुजरात टायटन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर

WhatsApp Group

आयपीएल २०२४ चा (IPL) ६३ वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (GT vs KKR) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स १-१ गुण देण्यात आला आहे. त्यामुळे गुजरात संघाला मोठा फटका बसला आहे. गुजरात आता प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

गुजरात सध्या गुणतालिकेत ८ व्या क्रमांकावर आहे. गुजरातने आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. यात ५ सामने जिंकले आहेत तर ७ सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. कोलकाता विरुध्द गुजरातचा हा १३ वा सामना होता. परंतु पावसामुळे सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघाना १-१ गुण देण्यात आला. गुजरातचे आता १३ गुण झाले आहेत. मात्र हा संघ आता प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. गुजरातचा शेवटचा सामना १६ मे रोजी सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.

प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा गुजरात तिसरा संघ

आयपीएल २०२४ च्या प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा गुजरात टायटन्स हा तिसरा संघ ठरला आहे. याआधी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज आधीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. आता प्ले ऑफमधील उर्वरित ३ जागांसाठी ६ संघांमध्ये लढत होणार आहे. यात राजस्थान रॅायल्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॅायल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स याचा समावेश आहे.