Masturbation: ‘पार्टनर असूनही मी हस्तमैथुन करतो…’ या गोष्टीने त्रास होतोय? मानसिक कारणे आणि उपाय

WhatsApp Group

अनेकजणांना असा प्रश्न पडतो की, रिलेशनशिप किंवा विवाह झाल्यानंतर देखील हस्तमैथुन करणे योग्य आहे का? काहींना वाटते की पार्टनर असताना हस्तमैथुन करणे म्हणजे नात्यातील समाधान कमी होणे, तर काहींना ते पूर्णपणे सामान्य आणि वैयक्तिक गरज म्हणून मान्य असते. प्रत्यक्षात, शरीराची लैंगिक गरज, भावना, सवय आणि मानसिक रिलॅक्सेशन यामध्ये मोठी भूमिका असते.

हस्तमैथुन हे वैयक्तिक लैंगिक अभिव्यक्तीचे एक माध्यम आहे. नात्यात असताना देखील, प्रत्येकाची लैंगिक इच्छा, वेळ, मूड आणि शारीरिक ऊर्जा समान नसते. काही वेळा पार्टनर उपलब्ध नसणे, अंतर, आजारपण किंवा मूड मॅच न होणे यामुळे स्वयंप्रेरित लैंगिक समाधान शोधणे हे नैसर्गिक आहे.

हस्तमैथुन केल्याने नात्यावर नकारात्मक परिणाम होतोच असे नाही. उलट, अनेक तज्ञांच्या मते यामुळे स्वतःच्या शरीराविषयी जागरूकता वाढते, लैंगिक तणाव कमी होतो, झोप सुधारते आणि परफॉर्मन्सबाबत प्रेशर कमी होऊ शकतो. मात्र, हे पार्टनरशी गुपित ठेवून केला जात असेल व त्यामुळे भावनिक अंतर वाढत असेल तर संवाद महत्त्वाचा ठरतो.

मुख्य गोष्ट म्हणजे बॅलन्स आणि ट्रान्सपरन्सी. हस्तमैथुन पार्टनरसोबतच्या सेक्षुअल लाइफचा पर्याय बनू नये. जर त्यामुळं तुमची पार्टनरसोबतची इच्छा, संवाद किंवा जवळीक कमी होत असेल, पोर्नची अति सवय लागत असेल किंवा व्यसनासारखी परिस्थिती निर्माण होत असेल, तर तो इशारा मानावा आणि उपाय शोधावा.

शेवटी, रिलेशनशिपमध्ये याबाबत ओपन आणि मॅच्युअर संवाद होणे सर्वात आवश्यक आहे. एकमेकांच्या भावना, गरजा, मर्यादा आणि अपेक्षा जाणून घेतल्यास नातं अधिक आरोग्यदायी राहू शकतं. हस्तमैथुन हा पर्सनल चॉईस आहे, परंतु त्याचा नात्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.