लोकप्रिय टीव्ही मालिका ‘गम है किसी के प्यार में’ हा स्टार प्लस शोपैकी एक आहे. बऱ्याच दिवसांपासून हा शो आणि या शोचे स्टार्स आणि टीम ट्रोल होत आहे. शोमध्ये होत असलेले बदल पाहून चाहत्यांना तो अजिबात आवडला नाही. असे असूनही, नील भट्ट आणि आयेशा सिंहचा हा शो टीआरपीमध्ये सातत्याने पुढे जात आहे, दरम्यान, गम है किसी के प्यार में या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे.
स्टार प्लसच्या लोकप्रिय शो गम है किसी के प्यार मेंच्या सेटवर शुक्रवारी दुपारी ४ वाजता आग लागली. मुंबईतील गोरेगावमध्ये या मालिकेचा सेट आहे. इतर अनेक मालिकाही जवळपास शूट होत होत्या. आग इतकी भीषण आहे की ती इतर ठिकाणीही पोहोचत आहे. यावेळी 1 हजारांहून अधिक लोक येथे उपस्थित होते. आगीच्या घटनेत निष्काळजीपणाची बाब समोर येत आहे. आग टाळण्यासाठी सेटवर कोणतीही फायर सेफ्टी नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, आगीने दोन मालिकांचे सेट जळून खाक झाले आहेत. दोन्ही मालिकांचा सेट ‘गम है किसी के प्यार में’ या शोच्या सेटच्या अगदी जवळ आहे.
View this post on Instagram
शोशी संबंधित एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे या संपूर्ण घटनेदरम्यान कोणीही जखमी झाल्याची बातमी समोर आलेली नाही. अग्निशमन दलाच्या पथकाने वेळीच घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. अखिल भारतीय सिने कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी आगीच्या घटनेची माहिती दिली.
ते निर्माता, चॅनल आणि प्रॉडक्शन हाऊसवर एफआयआर दाखल करण्याबाबतही बोलले आहे. यासोबतच फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालकावर कारवाई केल्याची बाबही समोर आली आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सेटवर आगीच्या उंच ज्वाळा आणि धुराचे लोट दिसत आहेत. बाहेर लोकांची गर्दी झाली असून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.