बहुमजली इमारतीला भीषण आग, 52 जणांचा मृत्यू

0
WhatsApp Group

Johannesburg Massive Fire Accident 52 Kills: दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली. या घटनेत 52 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. असोसिएटेड प्रेस (एपी) या वृत्तसंस्थेनुसार, आगीच्या घटनेत इतर 43 लोक भाजले आणि जखमी झाले, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी पहाटे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

आगीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मदत आणि बचावकार्य सुरू आहे, मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या आगीचे कारण आणि नुकसानीचा आकडा समजू शकलेला नाही.