अहमदाबादच्या रुग्णालयात भीषण आग

0
WhatsApp Group

अहमदाबादमधील एका रुग्णालयात शनिवारी सकाळी भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 31 गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. आगीच्या घटनेनंतर रुग्णालयातील सुमारे 100 रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना शाहीबाग येथील राजस्थान रुग्णालयातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान रुग्णालयाला पहाटे आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्यापासून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी आत गेले, मात्र आगीसोबत धुराचे लोट असल्यामुळे जास्त काळ आत राहू शकले नाहीत, असे सांगण्यात येत आहे. पंख्यांमुळे धूर निघत असून गरज भासल्यास रुग्णालयाच्या पार्किंगचे छत तोडले जाऊ शकते.