इराकच्या निनवेह प्रांतात एका लग्न समारंभात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. निनवेह प्रांतातील हमदानिया जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा लग्नाची पार्टी सुरू होती. यावेळी तेथे भीषण आग लागली. ज्यामध्ये 100 हून अधिक लोकांचा जळून मृत्यू झाला. या भीषण आगीत 550 लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. इराकी राज्य माध्यमांनी बुधवारी सकाळी स्थानिक सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. कारण अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
110 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी
राज्य माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरी संरक्षण म्हणाले की, काही लोक लग्न समारंभात फटाके पेटवत होते. दरम्यान, उत्तर-पूर्व भागातील एका मोठ्या कार्यक्रमाच्या हॉलमध्ये आग लागली. आग लागल्याचे समजताच एकच गोंधळ उडाला. निनवेहचे डेप्युटी गव्हर्नर हसन अल-अल्लाक यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, आतापर्यंत 110 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी रात्री 10.45 च्या सुमारास ही आग लागल्याचे वृत्त आहे.
Video shows the moment fire broke out in a weeding in Hamdaniyah
110 dead including bride and groom
550 injured #Iraq #Hamdaniyah #Fire pic.twitter.com/y3k4aiRvbM
— North X (@__NorthX) September 27, 2023
फटाक्यांमुळे आग
इराकची सरकारी वृत्तसंस्था INA ने बुधवारी सकाळी आगीत 150 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती दिली. हमदानियाह हे राजधानी बगदादच्या उत्तर-पश्चिमेला सुमारे 400 किमी अंतरावर मोसुलच्या उत्तरेकडील शहराच्या बाहेर स्थित आहे. दुसरीकडे, इराकच्या सिव्हिल डिफेन्सने सांगितले की, सुरुवातीच्या अहवालावरून असे दिसून आले आहे की उत्सवादरम्यान वापरण्यात आलेले फटाके आगीचे कारण असू शकतात. नागरी संरक्षण अधिकार्यांनी बुधवारी पहाटे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “प्राथमिक माहितीवरून असे दिसून आले आहे की लग्नादरम्यान फटाके वापरण्यात आले होते, ज्यामुळे हॉलमध्ये आग लागली.”
या सोहळ्याला 1000 लोक उपस्थित होते
अल जझीराच्या रिपोर्टनुसार, इराकमध्ये लग्न समारंभात फटाके वाजवणे ही एक सामान्य गोष्ट आहे. हमदानिया येथे एका लग्न समारंभात आग लागली तेव्हा जवळपास एक हजार लोक तिथे उपस्थित होते. अल-जझीराच्या वृत्तानुसार, इव्हेंट हॉलमध्ये आग लागण्याचे कारण ज्वलनशील पदार्थ असू शकते.