नाईट क्लबमध्ये भीषण आग; 29 जणांचा मृत्यू

0
WhatsApp Group

Istanbul Nightclub Fire: इस्तंबूलमधील नाईट क्लबमध्ये भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. ज्यामध्ये 29 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. कुठल्यातरी कटाचा भाग म्हणून ही आग लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये अनेकांना अटकही करण्यात आली आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत किमान 29 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्तंबूलच्या गव्हर्नर ऑफिसने सांगितले की, इतर आठ जण जखमी झाले आहेत. यातील सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेशी संबंधित काही व्हिडिओही समोर आले आहेत. शहराच्या युरोपीय भागातील बेसिकटास जिल्ह्यात ही आग लागली. आगीत मृत्युमुखी पडलेले सर्व कामगार असल्याचे सांगण्यात येत आहे. तुर्कीचे न्यायमंत्री यिलमाझ टुनाक यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. पाच जणांवर अटक वॉरंट जारी करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्यामध्ये नाईट क्लब व्यवस्थापनातील तीन आणि बांधकामाशी संबंधित एका व्यक्तीचा समावेश आहे.