West Bengal: वीटभट्टीत भीषण स्फोट, 4 जणांचा मृत्यू, 25 जखमी

WhatsApp Group

पश्चिम बंगालच्या उत्तर 24 गर्गना जिल्ह्यातून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. येथील वीटभट्टीवर भीषण स्फोट झाला. या अपघातात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 25 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले, तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस या घटनेचा फॉरेन्सिक तपास करत आहेत.

वीटभट्टीमध्ये अचानक मोठा स्फोट झाला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. वीटभट्टीमध्ये अचानक मोठा स्फोट झाला, त्यामुळे भट्टीची चिमणी कोसळून मोठी दुर्घटना घडली. ही घटना बसीरहाटच्या धलतिताह गावातली आहे. वीटभट्टीत स्टोव्ह पेटवताना स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातात जखमी झालेले सर्वजण भट्टीवर काम करणारे मजूर आहेत. ढिगाऱ्याखालून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. सध्या दोघांची प्रकृती गंभीर आहे.