Face Mask in Maharashtra : राज्यात पुन्हा मास्क सक्ती, आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

WhatsApp Group

Face Mask in Maharashtra : कोरोना रुग्णांची सख्या वाढत असल्यामुळे राज्यात आता पुन्हा मास्क (Mask) सक्ती करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने (Department of Health) दिल्या आहेत. याबाबत आरोग्य विभागाने एक पत्र जारी केले असून आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालय, कॉलेज, शाळा इत्यादी ठिकाणी मास्क सक्ती असणार आहे.

काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत (corona Patients) झपाट्याने वाढ होत आहे. कालच्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये ११३४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर ५६३ रुग्ण बरे झाले होते. त्यामुळे आता दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, वाढत्या राज्यातील कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कालच चिंता व्यक्त केली होती. शिवाय राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.