T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रोहित शर्माचा विक्रम मार्टिन गुप्टिलने मोडला

WhatsApp Group

T20 क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि मार्टिन गप्टिल यांच्यात जबरदस्त स्पर्धा आहे. T20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याची ही शर्यत आहे ज्यामध्ये गुप्टिलने पुन्हा एकदा रोहित शर्माला मागे टाकले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 15 धावा करून गुप्टिल T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.

मार्टिन गुप्टिलने 121 T20सामन्यात 3497 धावा आहेत. त्याचबरोबर रोहित शर्मा 3487 धावांसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली 3308 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या एक वर्षापासून रोहित, गुप्टिल आणि विराट यांच्यात T20 मध्ये नंबर 1 होण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. मात्र, आतापर्यंत तीनपैकी एकाही फलंदाजाला जास्त काळ अव्वल स्थान पटकावता आलेले नाही.

वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या T20 सामन्याबद्दल बोलायचे झाले तर वेस्ट इंडिजचा सलामीवीर ब्रँडन किंग आणि शामर ब्रूक्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर संघाने न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह, वेस्ट इंडिजने 3 सामन्यांच्या T20 मालिकेत क्लीन स्वीपपासून स्वतःला वाचवले. त्याचबरोबर न्यूझीलंडने ही मालिका 2-1 अशी आपल्या नावे केली.

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • मार्टिन गुप्टिल (3497 धावा)
  • रोहित शर्मा (3487 धावा)
  • विराट कोहली (3308 धावा)
  • पॉल स्टर्लिंग (2975 धावा)
  • अॅरॉन फिंच (2855 धावा)