Maria Sharapova: रशियन सुंदरी मारिया शारापोव्हा बनली आई, इन्स्टावर शेअर केले बाळाचे फोटो

WhatsApp Group

रशियाची माजी टेनिसपटू मारिया शारापोव्हा (Maria Sharapova) हिच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. ३५ वर्षीय शारापोव्हाने एका इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ही बातमी संपूर्ण जगाला सांगितली आहे.

तसेच, रशियन टेनिस स्टारने मुलगा आणि तिचा प्रियकर अलेक्झांडर गिल्केसह एक फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सर्वात सुंदर, प्रेमाची भेट.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Maria Sharapova (@mariasharapova)

रशियन शारापोव्हा आणि ब्रिटिश अलेक्झांडर या दोघांचे हे पहिले अपत्य आहे. दोन वर्षे डेट केल्यानंतर दोघेही 2020 मध्ये एंगेजमेंट केली. त्यांनी आपल्या मुलाचे नाव थियोडोर (Theodore) ठेवले आहे. ग्रीक भाषेत हे नाव अतिशय सुंदर मानले जाते. याचा अर्थ दैवी देणगी असा आहे.

शारापोव्हाने मुलगा थिओडोरच्या जन्मतारखेचाही वेगळ्या पद्धतीने खुलासा केला आहे. तिने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये मुलाचे नाव थियोडोर लिहिले. यानंतर, रोमन अंकांमध्ये मुलाची जन्मतारीख देखील 1 जुलै 2022 सांगितली आहे.

पाच वेळा ग्रँडस्लॅम विजेती शारापोव्हा या वर्षी 19 एप्रिलला 35 वर्षांची झाली. फेब्रुवारी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन खेळल्यानंतर तिने टेनिस जगताचा निरोप घेतला होता. तिच्या निवृत्तीमुळे चाहते खूप निराश झाले होते.