
मित्रांनो आयुष्य जगत असताना सोबतीला नुसते विचार असुन चालत नाही.तर ते विचार सुंदर अर्थात चांगले सुविचार असावे लागतात. ज्याच्या जवळ सुंदर विचार सुविचार आहेत.तो कधीही एकटा नसतो.आज आपण असेच काही सुंदर विचार वाचणार आहेत. आम्ही याठिकाणी आपल्यासाठी मराठी भाषेतील सर्वोत्तम व सुंदर मराठी सुविचार घेऊन आलो आहोत. ते आपण विविध माध्यमातून आपल्या कुटुंबात, मित्र-मैत्रिणी, प्रियजनांना शेअर करून त्यांना प्रेरित करू शकता.
- घराची योग्यता व्यवस्था हीच घराची शोभा, संतुष्टता हीच घराची लक्ष्मी, समाधान हेच घराचे वैभव ,धार्मिकता हाच घराचा कळस ,अतिथ्य हेच घराचे सुख.
- घराची योग्यता व्यवस्था हीच घराची शोभा, संतुष्टता हीच घराची लक्ष्मी, समाधान हेच घराचे वैभव ,धार्मिकता हाच घराचा कळस ,अतिथ्य हेच घराचे सुख.
- माणूस हा काणत्याही धर्माचा नसून तो प्रथम माणूस असतो.माणुसकीने वागणे हाच प्रत्येक माणसाचा धर्म आहे.म्हणून प्रत्येकाने माणुसकीने वागावे.
- बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते.
- फांद्या तोडून झाड मरत नाही, घर सोडून माया तुटत नाही आणि वेष बदलून स्वभाव पालटत नाही, आसक्ती मुळापासून तोडावी लागते.
- या भुतलावर, दानासारखा दुसरा धर्म नाही, लोभासारखा दुसरा शत्रू नाही, सौजन्यासारखे दुसरे भूषण नाही. आणि संतोषाएवढे धन नाही.
- क्षमेसारखे तप नाही, संतोषापेक्षा मोठे सुख नाही, लोभासारखा रोग नाही, दयेपेक्षा मोठा धर्म नाही.
- मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर मिळतेच.
माशांसाठी हवा आणि पाणी जितके आवश्यक आहे तितकेच मानवी जगण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक आहे.
- चिता मेलेत्या माणसांना जाळते तर चिंता जिवंत माणसांना जाळत राहते.
- प्रीतीची वेल, धर्माचं कुंपण मानीत नाही.
- चरित्र हाच खरा इतिहास असतो.
- अचूकता पाहिजे असेल तर सराव महत्त्वाचा आहे.
- कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे.
- खूप हुशारी पेक्षा चिमूटभर विवेक श्रेष्ठ असतो.
- जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.
- मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन आहे.
आत्मविश्वास असल्याशिवाय माणसाला यश मिळू शकत नाही. आत्मविश्वास ही अशी उर्जा आहे जी एखाद्या व्यक्तीला आव्हाने, अडचणी आणि यशासह येणार्या अडथळ्यांना तोंड देण्यास धैर्य देते.
- गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.
- दृष्टिकोण हा मनाचा आरसा आहे तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.
- संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.
- जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला असतो.
- ज्याचा अंत गोड ते सर्वच गोड असते.
- तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळालेले नसले तरी मिळालेले काम आवडीने करा.
- आशेचे बी पेरले व प्रयत्नांचे खतपाणी योग्यवेळी दिले तर यशाचे पीक पदरात पडणारच.
- अपमान व गोळ्या दातांनी चावता येत नाहीत.त्या सरळ पोटात गिळणेच चांगले.
चांगले सुविचार आपल्याला प्रत्येक आव्हानात प्रेरित व सकारात्मक राहण्याचा मोलाचा सल्ला देतात. ते आपल्याला आशावादी राहण्यास सतत सुचवत असतात.
Chanakya Niti : या 5 गोष्टी चुकूनही इतरांना सांगू नका; नाहीतर होईल पश्चाताप