Marathi suvichar sangrah | सर्वोत्तम मराठी सुविचार संग्रह

WhatsApp Group

काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता आहे, पहिले संकल्प आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारे धैर्य. तथापि, जेव्हा आपले विचार संघर्षाच्या मार्गाने मोडण्यास सुरवात करतात, तेव्हा अशा वेळी एखाद्यास आवश्यक असते जो आपल्याला पुन्हा उभे राहण्याची मराठी सुविचार प्रेरणा देऊ शकेल.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यशस्वी आणि महान लोकांद्वारे दिलेल्या यशाची काही मूलभूत सुविचार सांगणार आहोत, जे त्यांच्या कठीण परिस्थितीत आपले सामर्थ्य निर्माण करून पुढे जाण्यासाठी प्रेरणा घेऊ शकतात.तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो.

  • जीवनात कधी कुणाला कमी समजू नका ,कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही
  • श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे व्यक्तीमत्व.
  • भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे.
  • जगात 7 अब्जापेक्षा जास्त लोक आहेत त्यातील एका माणसाच्या मताने तुम्ही निराश होऊन ध्येय सोडणार आहात का?
  • परिस्थितीच्या हातातली कधीच कठ पुतळी बनू नका, कारण परिस्थितीत बदलण्याची ताकद तुमच्यात आहे.
  • यशाजवळ पोहचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
  • ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे

झाड लहान असताना, मुळाची वाढ जर योग्य पद्धतीने झाली नसेल तर, झाडावर किती फळ येणार हि दिवास्वप्न पाहणे मुर्खपणाचे आहे , अगदी तसेच, जर आपल्या पाल्याला लहानपणापासून संस्कार आणि शिस्त शिकवून त्याची मानसिक बैठक भक्कम नसेल तर उगाच मोठमोठ्या करीअरच्या स्वप्नांचे मजले बांधणे मुर्खपणाचेच आहे.

  • जाण्याचा विचार कधीही करु नका कारण तुम्हाला परत
  • जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे,तेव्हढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे.
  • तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
  • ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
  • स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
  • तुलना करावी पण अवहेलना करू नये.
  • अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.