
सुविचार ही माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी शक्ती आहे. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे मराठी सुविचार आचरणात आणायला हवे.
क्र. | सुविचार मराठी |
---|---|
1 | कठीण रस्ते हे नेहमी सुंदर ध्येयापर्यंत पोचवतात |
2 | जगात तेच लोक तुम्हाला नाव ठेवतात ज्यांची तुमच्यापर्यंत पोचण्याची औकात नसते |
3 | जीवनावर मराठी स्टेटस जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत शिकत राहा कारण अनुभव हाच सर्वात मोठा गुरु आहे |
4 | संयम ही एक अशी स्वारी आहे जी तिच्यावरच स्वार असलेल्या व्यक्तीला पडू देत नाही न कोणाच्या पायांमध्ये आणि नाही कोणाच्या नजरेतून |
5 | सर्वात उत्तम बनण्यासाठी तुम्हाला सर्वात वाईट परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल |
6 | ‘शब्द’ हेच जीवनाला अर्थ देतात आणि ‘शब्द’ हेच जीवनाचा अनर्थ करतात |
7 | सुखात वाटेकरी खूपच असतात. दुःखात जो वाटेकरी असतो तोच आपला खरा मित्र असतो. |
8 | जो व्यक्ती दुसऱ्याच्या भरोशावर राहतो तो कधीही यश मिळवत नाही |
9 | जग कधीही तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करून दाखवा, स्वतःला सिद्ध करा |
10 | स्त्री ही अशी व्यक्ती आहे, तिला नवऱ्याची बायकोच होऊन चालत नाही तर वेळप्रसंगी त्याची मैत्रिण व त्याची आई सुद्धा व्हावे लागते. |
Marathi Suvichar आपल्याला अधिक प्रेरणा देतात, निराशावादीला आशावादी बनण्यास प्रेरित करतात. आपल्या हृदयात किंवा मनात चांगले विचार किंवा चांगले सुविचार असतील तर आपण प्रत्येक समस्येला एका वेगळ्याच दृष्टीकोनातून पाहू शकतो व त्याचा सामना करू शकतो.
11 | स्वतः च स्वतः ला पुढे लोटत रहा कारण इतर कोणीही तुमच्यासाठी हे करणार नाही |
12 | वर्षानुवर्षे मेहनत घेऊनही जग म्हणते की तुझे नशीब चांगले होते |
13 | मेहनत येवढ्या शांतपणे करा की, तुमचे यश धिंगाणा घालेल |
14 | मोठे व्हा पण त्यांच्यासमोर नाही ज्यांनी तुम्हाला मोठे केले |
15 | जे आपल्या पावलांच्या सक्षमतेवर विश्वास ठेवतात ते नेहमी ध्येयापर्यंत पोहचतात |
16 | स्वप्न ते नाहीत जे आपल्याला झोपेत दिसतात स्वप्न ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाहीत |
17 | मैदानात हरलेला व्यक्ती जिंकू शकतो, परंतु मनाने हरलेला व्यक्ती कधीही जिंकू शकत नाही |
18 | आयुष्याचे गणित कधीच चुकत नसतं, चुकतो तो चिन्हांचा वापर आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे असाध्य गोष्ट सुद्धा साध्य होते |
19 | आपण जे देतो ते आपल्याकडे परत येते म्हणून चांगल द्या चांगलच मिळेल |
20 | जिंकण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात |
चांगले सुविचार आपल्याला प्रत्येक आव्हानात प्रेरित व सकारात्मक राहण्याचा मोलाचा सल्ला देतात. ते आपल्याला आशावादी राहण्यास सतत सुचवत असतात.
21 | जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही |
22 | रस्ता सापडत नसेल तर स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्ब्यात ठेवले जातात |
23 | जीविताचे कोडे हे केवळ सुखाच्या मार्गाने सुटत नाही, दु:खही भोगले तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो |
24 | देवाला तुम्हाला काय हवय ते मागण्या पेक्षा तुमच्या योग्यतेप्रमाणे मागा… कदाचित तुमची योग्यता तुमच्या ईच्छे पेक्षा मोठी असेल… |
25 | परमेश्वराला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणींना हे सांगा की तुमचा परमेश्वर किती मोठा आहे… |
26 | क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात |
27 | गर्वाने मित्र शत्रू बनतात. |
28 | गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीच कारण बनायचं |
29 | अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे |
30 | प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करू नका, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा. |
सुविचार तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणतात. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन उंची गाठू शकता.
31 | तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत रहा |
32 | जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही, त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा नाती नाही |
33 | आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका |
34 | काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात करून दाखवायच्या असतात |
35 | ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की, जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते |
36 | समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत |
37 | आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो |
38 | पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात |
39 | आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते |
40 | कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते |