Marathi Suvichar: प्रेरणादायक अनमोल विचार

WhatsApp Group

माणसाचे विचार ही त्याची आयुष्याची पुंजी आहे. ज्या माणसाचा विचार भक्कम नाही त्याला आयुष्यात काहीच करता येत नाही. आपण अगदी शाळेपासूनच मराठी सुविचार शिकत असतो आणि ते आचरणात आणत असतो. मराठी सुविचार नेहमीच आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात. आपली कृती ही आपल्या विचारांवरच अवलंबून असते. 

मराठी सुविचार स्टेटस | Marathi Suvichar Status

  • भरलेला खिसा हा माणसाला नेहमी दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो
  • विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात, म्हणूनच ते विजेते ठरतात
  • अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. अपयशाने कधीच खचून जाऊ नका
  • अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे !
  • कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत कायम मनगटात ठेवा
  • समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. तुम्हीही संकटांचा सामना करताना शांत राहा
  • विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
  • संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात कायम असतं
  • टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा. कारण असे मित्रच जास्त विश्वासघात करतात
  • थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायलाॉ काय हरकत आहे.

सुंदर सुविचार मराठी (Suvichar In Marathi) हा तुमच्या आयुष्याचा पाया असतो. यामुळेच तुम्ही माणूस म्हणून घडत असता. खास करून हे मुलांसाठी लागू होऊ शकतात. तुम्हाला लहानपणापासून मनावर जे संस्कार देण्यात येतात त्याचप्रमाणे तुम्ही घडत असता. 

  • आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कोणत्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो
  • आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा
  • कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही
  • नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे
  • खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?
  • कोणतेही उद्दिष्ट मेहनती शिवाय साध्य होत नसते.
  • कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.
  • गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
  • गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं.
  • मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

परिस्थिती काय आहे यानुसार तुम्ही वागता. तुमच्या मनात सुविचार पक्के रूतलेले असतील तर तुम्ही कधीच चुकीचा मार्ग निवडणार नाही याची तुमच्या आई-वडिलांनाही खात्री असते. शिकवण आचरणात आणावी यासाठीच काही सुविचार असातात.

  • काम साध्य होईपर्यंत अडचणींना तोंड द्यावेच.
  • माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं.
  • माणसाचं छोटे दु:ख हे जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की त्याला खरोखरीच सुखाची चव येते.
  • मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.
  • डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
  • यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.
  • माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसे.
  • कलेची पारंबी माणसाला बळ देते.
  • काळ हे फार मोठे औषध आहे, मोठमोठ्या जखमाही काळाच्या मलमपट्याने बर्‍या होतात.
  • जसे सोने तप्त केल्याने शुद्ध होते, तसे पश्चातापाने मन पवित्र होते.

मराठी सुविचार तुम्ही तुमच्या आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवू शकता. कधी कधी आपण उदास होतो आणि अशा वेळी प्रेरणेची आणि उत्साह देण्याची गरज असते. अशावेळी आपल्या मित्रमैत्रिणींना असे मराठी सुविचार पाठवून त्यांना बळ द्या.

  • जितका मोठा संघर्ष असेल तितकेच तुमचं यश शानदार असेल.
  • उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य प्राप्त करत नाही.
  • लोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष्य तुमच्यावर कृपा करो वा न करो, तुमचा मृत्यू आज होवो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका.
  • प्रत्येक दुःख हे आपल्याला एक नवा धडा शिकवते आणि प्रत्येक शिकलेला धडा हा माणसाला बदलतो.
  • आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येकवेळी अजून एकदा प्रयत्न करणे हाच आहे हे कायम लक्षात ठेवा.
  • रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या  स्वप्नांच्या मागे लागा.
  • तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे.
  • नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.
  • निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय सध्या होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात.
  • आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल हे खरं आहे.