चांगले विचार ही सर्वात मोठी शक्ती असून ज्या माणसांकडे चांगल्या विचारांचा पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत कधीच भक्कमपणे उभी राहू शकत नाही. नकारात्मक विचार करणाऱ्यांना त्याचे वाईट परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. कारण अशा लोकांच्या आयुष्यात चांगले, हितकारक कधीच घडत नाही. त्यामुळे चांगले विचार Best Marathi Quotes ही आताच्या काळाची गरज आहे.
- समस्या तुम्हाला कमकुवत नाही तर मजबूत बनवायला येतात.
- तुम्ही एकटे असाल तर आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा आणि सर्वांसोबत असाल तर जीभेवर नियंत्रण ठेवा.
- सभ्य घरा इतकी छान शाळा नाही आणि चांगल्या पालकांसारखा चांगला शिक्षक नाही.
- भविष्य या गोष्टीवर अवलंबून आहे की, आज तुम्ही काय करताय!
- राग आणि असहिष्णुता हे समजूतदारपणाचे शत्रू आहेत.
- जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.
- मौन हे सर्वात शक्तिशाली भाषण आहे.
- ज्यांच्या कडून काही आशा नसतात तेच लोक अनेकदा चमत्कार करतात!
- अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास.
- प्रेमाने जे मिळते ते कायमचे टिकून राहते.
आयुष्य जगत असताना सोबतीला फक्त विचार असुन चालत नाही. तर ते विचार सुंदर अर्थात सुविचार असावे लागतात. ज्याच्या जवळ सुंदर विचार आहेत तो कधीही एकटा नसतो. आज आपण असेच काही सुंदर सुविचार वाचणार आहोत.
- मनाला उचित विचारांची सवय लागली कि उचित कृती आपोआप घडते.
- ईश्वर सत्य आहे असे म्हणण्यापेक्षा सत्य हेच ईश्वर आहे असे म्हणा.
- आवश्यकतेपेक्षा जास्त आपल्या ज्ञानावर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे.
- कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम पाळणे हेच शौर्याचे लक्षण आहे.
- उत्पन्न कमी असेल तर खर्चावर आणि माहिती कमी असेल तर शब्दावर नियंत्रण ठेवा.
- आयुष्यात तुम्ही किती माणसे जोडली यावरुन तुमची खरी श्रीमंती कळते.
- तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.
- आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही.
- बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करू शकतो.
कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे मराठी सुविचार वाचून आपल्या आचरणात आणणे गरजेचे आहे.
- उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही.
- जे आपल्याला करावंसं वाटतं ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे.
- अज्ञान नेहमी परिवर्तनास घाबरतं.
- माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.
- प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआपच गवसतात.
- चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
- चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही.
- धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे.
- प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते.