मराठी प्रेरणादायी सुविचार संग्रह Marathi Suvichar

WhatsApp Group

मराठी प्रेरणादायी सुविचार संग्रह (Best Marathi Suvichar Sangrah) हे माणसांना त्यांच्या कठीण परिस्थितीत संकटाना सामोरे जाण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे जेव्हा आपणास संकटात एकटे वाटत असेल तेव्हा तुम्ही या सुंदर मराठी प्रेरणादायी सुविचार संग्रहाचा उपयोग नक्की करू शकतात हे सोपे आणि सुंदर मराठी सुविचार आवडल्यास नक्की शेअर करा.

1) “मनात नेहमी जिंकण्याची आशा बाळगली पाहिजे, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ तर नक्कीच बदलते.”
2) “शहाणा माणूस नेहमी एकटा असतो आणि दुर्बल व्यक्ती नेहमीच घोळक्यात दिसून येते.”
3) “जर तुम्हाला खरच आनंद अनुभवायचा असेल तर आपल्या दु:खा सोबत खेळायला शिका.”
4) “स्वतः एक चांगला माणूस बना म्हणजे, जगातील एक वाईट माणूस कमी झाल्याची तुम्हाला खात्री असेल.”
5) “तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो.”
6) “लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते, तोंडावर ओढुन घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात.”

7) “आपण अशा ठिकाणी पोहोचलो पाहिजे, जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी केल पाहिजे.”
8) “आयुष्य हे सर्कस मधल्या विदुषकाप्रमाणे बनले आहे, कितीही दुखी असेल तरी जगासमोर हसवाच लागतं.”
9) “परिस्थितीच्या हातातली कठपुतळी होऊ नका, कारण आपणास परिस्थिती बदलण्याची शक्ती आहे. “
10) “यशापर्यंत पोहोचण्यासाठी, शॉर्टकट कधीच नसतो.”
11) “एकवेळ जग जिंकता येईल,पण मनाचे विकार जिंकता येत नाहीत, ते जो जिंकतो, तोच महावीर.”
12) “दुसरे ध्येय ठेवण्यासाठी किंवा नवीन स्वप्न पाहण्यास, आपण कधीही वयाने वयस्कर नाही.”

13) “आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे, काही फरक पडत नाही, कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे.”
14) “यशाची गुरुकिल्ली, सकारात्मक विचार.”
15) “कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतिचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.”
16) “आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दु: खी होऊ नका, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात.”
17) “भाषा हे जर एक सुमन असेल तर, व्याकरणा शिवाय त्याचा सुगंध दरवळणार नाही.”
18) “हास्य ही निसर्गाची आणि देणगीची एक अनोखी भेट आहे, आपण ती जेव्हा अन जिथे हवी तशी उधळू शकतो.”