
सध्या महाराष्ट्र दोन कारणांनी चर्चेत आहे. एक म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणि दुसरं म्हणजे जवळपास दोन वर्षांनी पुन्हा सुरु झालेली वारकऱ्यांची वारी. सध्या राज्यातील वातावरण या वारीमुळे भक्तमय झालंय आणि अनेक माणसं मोठ्या संख्येनं वारीमध्ये सहभागी होताना दिसत आहेत.
यात अगदी मराठी कलाकारांचा देखील समावेश आहे. प्रसिद्ध अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी देखील यंदा वारीला गेली असून तिथे ती वारकऱ्यांची सेवा करत आहे.
View this post on Instagram
कश्मिरानं नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे.