मराठमोळ्या अभिनेत्याचा हार्दिक पंड्याला टोला, म्हणाला – नारळ द्या…

0
WhatsApp Group

IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या चौथ्या पराभवानंतर टीमचा कर्णधार हार्दिक पंड्या पुन्हा एकदा चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. चेन्नई सुपर किंग्ज सोबत खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने खराब गोलंदाजी केली . या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिकने 3 षटकात 43 धावा दिल्या. पंड्याने शेवटच्या षटकात 26 धावा दिल्या. शेवटच्या षटकात सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनीने हार्दिकच्या गोलंदाजीत दमदार फटकेबाजी केली.

कर्णधार हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या डावातील शेवटचे षटक टाकायला आला होता पण त्याला हे माहीत नव्हते की हे षटक खूप महागडे असणार आहे. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पांड्याने डॅरिल मिशेलची विकेट घेतली, त्यानंतर एमएस धोनी क्रीजवर आला. धोनीने पहिल्याच चेंडूपासून पंड्यावर जोरदार हल्ला चढवला. धोनीने पंड्याला लागोपाठ तीन चेंडूंवर 3 षटकार ठोकले. धोनीची फलंदाजी आणि हार्दिकची फटकेबाजी पाहून रोहित शर्माही थक्क झाला. यानंतर रोहितची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान अभिनेता सौरभ चौघुलेने पंड्याच्या गोलंदाजीवर नाराजी व्यक्त केली आहे.  .”शेवटी त्याच 20 रन्सने हरलो.. अजून पण सांगतोय नारळ द्या…” असं सौरभ म्हणाला आहे.