पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गजांनी लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली.

WhatsApp Group

नवी दिल्ली – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज राजकारण्यांपासून ते अभिनेत्यांनीही शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


यासोबतच लता मंगेशकर यांच्यावर पूर्ण राष्ट्रीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसेच भारत सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर केला आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली.


शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लतादिदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अभिनेता सनी देओलनेही गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली.