
चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शक मनवा नाईकने आपल्यावर एका कॅब चालकाने गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्रीचा आरोप आहे की, जेव्हा ती टॅक्सीने घरी जात होती, तेव्हा कॅब चालकाने तिच्याशी गैरवर्तन केले आणि धमकी दिली. मनवा नाईकने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मनवासोबतची ही घटना शनिवारी संध्याकाळी मुंबईत घडली. ही गोष्ट त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे शेअर केली आहे. अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देताना, मुंबईचे सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी कॅब चालकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले की, ‘शहर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून लवकरच दोषीवर कारवाई केली जाईल.
त्यानंतर कॅब ड्रायव्हर अचानक तिच्यावर रागावू लागला आणि म्हणाला, ‘तू 500 रुपये दंड भरणार का?’ अभिनेत्रीचा दावा आहे की ड्रायव्हरने तिला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. जेव्हा अभिनेत्रीने कॅब पोलिस स्टेशनमध्ये नेण्यास सांगितले तेव्हा ड्रायव्हरने कॅब अंधारात उभी केली. यानंतर चालक भरधाव वेगाने कॅब घेऊन निघून गेला. यानंतर मनवा नाईक यांनी उबर सेफ्टी हेल्पलाइनवर कॉल केला. ती एक्झिक्युटिव्हशी बोलत होती, त्यादरम्यान ड्रायव्हरने कॅबचा वेग आणखी वाढवला. अभिनेत्रीने सांगूनही चालकाने कॅब थांबवली नाही. त्यानंतर तो कोणाला तरी फोन करत होता असं अभिनेत्रीने सांगितलं.
अभिनेत्री मदतीची याचना करू लागली. यानंतर मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी आणि ऑटोचालकाने कॅब ड्रायव्हरला घेरले आणि अभिनेत्रीची सुटका केली. मनवा नाईक म्हणाली की मी ठीक आहे, पण मला भीती वाटते. मुंबई जॉइंट सीपी नांगरे पाटील यांनी अभिनेत्रीला योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहेत. ते म्हणाले, ‘आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे! डीसीपी झोन 8 यावर काम करत असून दोषीला लवकरात लवकर अटक केली जाईल.