कुंडली भाग्य फेम मनितने ग्रीक गर्लफ्रेंडशी गुपचूप उरकलं लग्न

0
WhatsApp Group

कुंडली भाग्य फेम अभिनेता मनित जौरा याने आपल्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू केला आहे. त्याने गुपचूप 9 जुलै रोजी त्याची प्रदीर्घ काळची ग्रीक मैत्रीण अँड्रिया पॅनागिओटोपोलोशी लग्न केले. अँड्रिया एक नृत्य शिक्षिका आहे. त्यांच्या लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. आतापर्यंत अभिनेत्याने आपल्या लग्नाबाबत गुप्तता पाळली होती. मनितच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मनितने आपल्या लग्नाचा कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. आंद्रियाला सोयीस्कर नसल्याने पाहुण्यांनी सोशल मीडियावर काहीही पोस्ट करू नये, असेही त्याच्या निमंत्रणात नमूद करण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bombay Times (@bombaytimes)

मनितचे लग्न कुठे झाले?

मनितचे उदयपूरमध्ये लग्न झाले. लग्नाच्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. पण तरीही सर्वकाही व्यवस्थित होते. मनितने स्वतःच सर्व काही सांभाळले. मनितने लग्नासाठी 108 वर्षे जुनी तलवार आणली, जी त्याच्या पूर्वजांची होती. मनितने सांगितले की, त्या तलवारीवर पूर्वी फक्त घरातील पुरुषांचीच नावे होती. पण त्यावर त्याचे आणि पत्नी अँड्रियाचे नावही लिहिले आहे.

मनित आणि आंद्रियाची प्रेमकहाणी
दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे झाले तर ते 10 वर्षांपासून ओळखत आहेत. दोघेही विद्यार्थी आणि शिक्षक म्हणून भेटले होते. सुरुवातीला दोघे मित्र होते. 2019 मध्ये दोघांनी एकमेकांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या.