नारायण राणे तुमच्या अंगणामद्धे दोन धतुरे उगवले त्यांच्याकडे लक्ष द्या; मनीषा कायंदे यांची टीका

WhatsApp Group

मुंबईमध्ये प्रसाद लाड यांनी स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला होता. नारायण राणे यावेळी बोलताना म्हणाले, चाफा बोलेना, चाफा उगवेना. पण असाही एक चाफा आहे जो उगवत नाही, फुलत नाही आणि त्याला वासही येत नाही. असा चाफा फक्त मातोश्रीतच आहे, अजून कुठे नाही, अशा शब्दात राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. दरम्यान त्यांच्या टीकेला आता शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मनीषा कायंदे म्हणाल्या, अहो नारायण राणे, मातोश्री मध्ये चाफा फुलेल की नाही याची चिंता तुम्ही करू नका, परंतु तुमच्या अंगणामध्ये दोन धतुरे उगवले आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या!  त्यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा