मृत्यूनंतर प्रेयसीला कुंकू लावून घातले मंगळसूत्र…पाहा व्हिडिओ

WhatsApp Group

आसाममधून एक विचित्र घटना समोर आली आहे. आजच्या काळात जिथे प्रेम हा केवळ शरीराचा सौदा झाला आहे, तिथे काही लोक असे आहेत जे आपल्या प्रियकराला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडतात. आसाममधील एका तरुणाने आपल्या प्रेयसीवरील प्रेमाचे असे उदाहरण मांडले, जे ऐकून सगळेच भावूक झाले आहेत.

आसाममधील गुवाहाटी येथील एका खाजगी रुग्णालयात शुक्रवारी एका तरुणीचा आजारपणामुळे मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या प्रियकराने आपल्या मृत मैत्रिणीशी तिच्या अंतिम संस्कारात लग्न केले आणि आयुष्यभर अविवाहित राहण्याची शपथ घेतली. आपल्या प्रेयसीची वधू होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी बिटुपन तामुलीने तिच्या मृत्यूनंतरही तिच्याशी लग्न केले.

मोरीगावचा रहिवासी बिटुपन आणि चापरमुख येथील कोसुआ गावात राहणारी प्रार्थना बोरा हे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंधात असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दोघांच्याही घरच्यांना नात्याची आणि लग्नाची माहिती होती. “मृत पार्थना काही दिवसांपूर्वी अचानक आजारी पडली आणि तिला गुवाहाटी येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र शुक्रवारी रात्री तिचे निधन झाले,” असे त्यांचे नातेवाईक सुभोन बोरा यांनी सांगितले.

मोरीगाव येथील बिटुपन तामुली नावाच्या 27 वर्षीय तरुणाने चापरमुख येथील कोसुआ गावातील 24 वर्षीय मृत प्रार्थना बोरा हिच्या कपाळावर सिंदूर लावला, आणि मंगळसूत्र घातले.