औरंगाबाद – एकीकडे देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रातही जिल्हा बँका, नगरपालिका अशा निवडणुकांवर भर दिला जात आहे. अशीच निवडणूक औरंगाबादेतही होणार आहे.
औरंगाबाद येथे सध्या महापालिका निवडणुकीचे वातावरण आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या विजयाचे समीकरण तयार करत आहे.
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच आपापल्या उमेदवारीसाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत निवडणूक लढवू इच्छिणारा एक उमेदवार वेगळ्याच कारणामुळे राज्यभर चर्चेत आला आहे.
औरंगाबादमध्ये ‘निवडणुक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे’ असं लिहिलेला बॅनर शहरातील मुख्य ठिकाणी लावण्यात आला आहे. हा बॅनर आता पूर्ण राज्यभर व्हायरल होत आहेत. रमेश पाटील नावाच्या व्यक्तीने हा बॅनर लावला आहे.