Viral Video: मृत्यूच्या जबड्यात शिरण्याचा प्रयत्न! महाकाय ॲनाकोंडाच्या तोंडात घातले डोके; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
निसर्गातील सर्वात भीतीदायक जीवांपैकी एक असलेल्या ॲनाकोंडाच्या जवळ जाण्याची हिंमत कोणीही करणार नाही. मात्र, एका व्यक्तीने चक्क या महाकाय सापाच्या तोंडात आपले डोके घालून ‘स्टंट’ करण्याचा प्रयत्न केला. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा एक थरारक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, तो पाहून कोणाचेही काळीज धपापेल. ॲनाकोंडासारख्या हिंस्त्र जीवासोबत केलेली ही जीवघेणी चेष्टा पाहून नेटकऱ्यांनी या व्यक्तीवर जोरदार टीका केली आहे.
काळजाचा ठोका चुकवणारा तो क्षण
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कर्मचारी आ पसरलेल्या महाकाय ॲनाकोंडाच्या समोर उभा असल्याचे दिसते. सुरुवातीला तो कर्मचारी अत्यंत आत्मविश्वासाने आपले डोके त्या सापाच्या जबड्यात नेतो. मात्र, पुढच्याच क्षणी ॲनाकोंडा अचानक आक्रमक होतो आणि त्या व्यक्तीच्या डोक्याचा ताबा घेतो. तिथे उपस्थित असलेले इतर कर्मचारी त्याला वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसतात, पण ॲनाकोंडाची पकड सुटता सुटत नाही. हा भयावह देखावा पाहून कोणाच्याही अंगावर शहारे येतील.
— Stella Fisher (@StellaFish24481) January 4, 2026
एआय (AI) करामत की खरी घटना?
हा व्हिडिओ अवघ्या १५ सेकंदांचा आहे, पण त्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. ट्विटरवर (X) @StellaFish24481 या हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र, व्हिडिओचे बारकाईने निरीक्षण केले असता, तो खरा नसून AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) द्वारे तयार केलेला असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला आहे. प्रत्यक्ष जीवनात ॲनाकोंडासारखा प्राणी अशा प्रकारे डोके जबड्यात घेतल्यानंतर माणसाचा वाचणे अशक्यप्राय असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नेटकऱ्यांचा संताप आणि सावधगिरीचा इशारा
व्हिडिओ खरा असो वा एआय जनरेटेड, नेटकऱ्यांनी अशा प्रकारच्या स्टंटबाजीचा तीव्र निषेध केला आहे. “लाईक्स मिळवण्यासाठी निसर्गाशी आणि वन्यजीवांशी अशी क्रूर चेष्टा करणे चुकीचे आहे,” अशा प्रतिक्रिया युजर्स देत आहेत. काहींनी याला ‘निव्वळ मूर्खपणा’ म्हटले आहे, तर काहींनी तंत्रज्ञानाचा वापर करून अशा अफवा पसरवणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. वन्यजीव प्रेमींनी अशा धोकादायक स्टंट्सपासून दूर राहण्याचे आवाहन सर्वांना केले आहे.
