नवी दिल्ली – बिहारमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पत्नीने मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
बाळ जन्माच्या 48 तासानंतर पतीने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली आहे. पत्नीच्या मृतदेहाच्या बाजूला मुलीला सोडून तो पळाला. या घटनेमुळे आत्ता खळबळ उडाली आहे. मृत महिलेच्या घरी हा सर्व प्रकार समजल्यानंतर ते हादरले.
माहेरच्या लोकांना हा प्रकार समजल्यानंतर तातडीने ते मुलीच्या सासरी पोहोचले तर तेथे मुलीचा मृतदेह पडला होता आणि शेजारी लहान मुलगी रडत होती. या घटनेची माहिती समजताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हुंडा न दिल्यामुळे तिची हत्या करण्यात आली आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.