नवी दिल्ली – एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख आणि लोकसभेचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्या व्यक्तिची चौकशी केली असता त्या व्यक्तीकडे मिळालेलं शस्त्र जप्त करण्यात आलं आहे. तर त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
या हल्ल्यानंतर दिल्लीत असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, मी निवडणूक आयोगाला या गोळीबाराच्या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश देण्याची विनंती करतो. स्वतंत्र तपास करण्याची जबाबदारी यूपी सरकार आणि मोदी सरकारची आहे. याबाबत मी लोकसभा अध्यक्षांनाही भेटणार आहे.
One person apprehended. He’s being questioned, weapon recovered from him. His accomplice managed to flee, search operation is underway for him. We’ll update you when more facts come to the fore. Nobody was injured so far. We are checking the CCTV footage: Deepak Bhuker, SP Hapur pic.twitter.com/dn5DOULgxM
— ANI (@ANI) February 3, 2022
यूपी एडीजी कायदा आणि सुव्यवस्था यांनी या प्रकरणी सांगितले की, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी व्हिडिओ फुटेज आपल्या ताब्यात घेतले आहे. या घटनेप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले. आम्ही व्हिडिओ फुटेज तपासत आहोत. या घटनेची चौकशी करण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली असून ते अधिक तपास करत आहेत.