
बॉलिवूडची ग्लॅमरस दिवा म्हणून ओळखली जाणारी मलायका अरोरा (Malayka arora) अनेकदा तिच्या फिगरमुळे चर्चेत असते. तिच्या फिगर आणि फॅशन सेन्सच्या चर्चा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण, यावेळी मलायकाच्या ट्रेंडचे कारण काही वेगळेच आहे. अभिनेत्रीचा फॅशन सेन्स आता सोशल मीडियावर चेष्ठेचा विषय बनला आहे.
रविवारी मलायका अरोरा एका इव्हेंटमध्ये दिसली जिथे ती तिच्या कपड्यांमुळे ट्रोल झाली. मिस इंडिया इव्हेंटमध्ये मलायका पोहोचली होती, जिथे ती कॅमेऱ्यात कैद झाली होती. सोशल मीडियावर तिच्या लेटेस्ट ड्रेसिंग स्टाइलच्या चर्चा आहेत. वयाच्या 48 व्या वर्षीही मलायका अरोरा आपल्या सेक्सी फिगरने आपल्या लाखो चाहत्यांना घायाळ करते. दरम्यान, मिस इंडिया कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेली मलायका आता तिच्या ड्रेसमुळे ट्रोल होत आहे. अभिनेत्रीच्या पारदर्शक पोशाखामुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे.
गोल्डन कलरच्या या पारदर्शक बॉडीकॉन ड्रेसमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत आहे. तिची किलर फिगर कोणालाही तीच्याकडे पाहण्यास भाग पाडते आहे. पण, यावेळी तिच्या सौंदर्याला लोकांकडून दाद मिळत नसून कमेंट्स येत आहेत.
View this post on Instagram
सोशल मीडियावर मलायकाचा हा व्हायरल ड्रेस आणि तिचा फॅशन सेन्स काहींना अजिबात आवडला नाही. मलाइकाला ट्रोल करताना एका यूजरने तिला स्वस्त केंडल जेनर म्हटलं आहे (केंडल जेनर हॉलिवूडची प्रसिद्ध मॉडेल).