Eid 2022 Special: यंदाच्या ईदला घरीच बनवा ‘हा’ खास पदार्थ, जाणून घ्या रेसिपी…

WhatsApp Group

Eid 2022: मुस्लिम समाजाच्या मोठ्या सणांपैकी एक म्हणजे ईद-उल-फित्र (Eid Mubarak) आहे. रमजानच्या पवित्र महिन्याच्या शेवटच्या दिवशी देशभरात ईद सण मोठ्या थाटामाटात हा सण साजरा केला जातो.

ईद हा सण शांती आणि बंधुभावाचा संदेश घेऊन येतो. या दिवशी लोक नवीन कपडे घालून नमाज अदा करतात. शांतता आणि एकोप्यासाठी प्रार्थना करतात. ईदच्या खास दिवशी मित्र आणि प्रियजनांना घरी बोलावतात. ईदच्या शुभेच्छा देत शिलखुरमा देऊन त्यांचे तोंड गोड करतात.

ईद सणासाठी तुम्ही घरीच खास शेवयांची खीर अर्थात शिरखुरमा बनवू शकतात. आज आम्ही तुम्हाला शिरखुरमाच्या रेसिपीबद्दल माहिती घेऊन आलो आहे. तुम्ही घरीच शिरखुरमा बनवू शकतात.

शिरखुरमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य…

  • शिरखुरम्यासाठी बारीक शेवया वापरू शकतात.
  • तूप – 2 टी स्पून
  • दूध क्रीम
  • साखर – एक कप
  • ड्राई फ्रूट्स मिक्स अर्थात सुका मेवा – 200 ग्रॅम
  • इलायची – 50 ग्रॅम

घरीच बनवा शिरखुरमा..

  • शेवयांची खीर अर्थात शिरखुरमा बनवण्यासाठी प्रथम शेवया चांगल्याप्रकारे भाजून घ्या.
  • शेवया खरपूस भाजल्यामुळे खीरची चव दुप्पट वाढते.
  • दूध क्रीम शेवयांमध्ये घालून 20 ते 25 मिनिटे मंद आचेवर शिजवा.
  • दूध घट्ट झाल्यावर शेवयामध्ये साखर घालून मिक्स करा.
  • साखर विरघळली की वर ड्रायफ्रुट्स टाका आणि इलायची घाला.
  • तुमची शेवयांची खीर आता तयार झाली आहे.