Apple Jam: घरातच बनवा बाजाराप्रमाणे चविष्ट सफरचंदाचे जाम

WhatsApp Group

सकाळचा नाश्ता म्हटलं की घाईघाईमध्ये ब्रेड, बटर आणि जाम हा तर अगदी घराघरात ठरलेलाच असतो. ऑफिसला जाताना अथवा सकाळीच अगदी लवकर जायचं असेल तर तेव्हा बनवायला वेळ नसतो. मग अशावेळी सर्वात पहिले लक्ष जातं ते म्हणजे फ्रिजमध्ये असणाऱ्या ब्रेडकडे. लहान मुलांचा तर अगदी आवडता नाश्ता म्हणजे ब्रेड, बटर आणि जाम.

पण तुम्हाला माहीत आहे का तुम्ही हे जाम घरीदेखील तयार करू शकता. बाहेर एक बाटली विकत घ्यायची म्हटलं की 100 रूपयांची नोट द्यावीच लागते. पण तुम्ही स्वादिष्ट, चविष्ट आणि त्याचबरोबर हेल्दी असे सफरचंदाचे जाम घरच्या घरी करू शकता आणि तेदेखील बाजारापेक्षा अधिक चांगले. याची सोपी आणि मस्त रेसिपी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. चला तर मग जाणून घेऊ कसे बनवायचे सफरचंदाचे जाम.

साहित्य 

  • 1 किलो सफरचंद
  • अर्धा किलो साखर
  • लिंबाचा रस
  • 1 चमचा वेलची पावडर
  • अर्धा चमचा दालचिनी पावडर (तुम्हाला आवडत असल्यास)

बनवण्याची पद्धत 

  • सर्व प्रथम, एका पॅनमध्ये मध्यम आचेवर 10 मिनिटे पाणी उकळवा.
  • पाणी उकळल्यानंतर त्यात सफरचंदाचे तुकडे आणि लिंबाचा रस घाला.
  • एका प्लेटने पॅन झाकून ठेवा आणि सफरचंद मऊ होईपर्यंत 10 ते 15 मिनिटे मंद आचेवर शिजवा.
  • सफरचंद मऊ झाल्यावर मोठ्या चमच्याने सफरचंद चांगले मॅश करा आणि त्यात साखर मिसळा.
  • सफरचंदाचे मिश्रण सतत ढवळत राहा जेणेकरून ते तव्याला चिकटणार नाही आणि जळणार नाही. मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटे ते जाम सारखे होईपर्यंत शिजवा.
  • आता जॅममध्ये वेलची पूड घाला, जॅम प्लेटमध्ये एक चमचा ठेवा आणि त्यातून पाणी वेगळे वाहत आहे का ते पहा, नंतर जाम जास्त शिजवा.
  • जाम चांगला शिजला की गॅस बंद करा. ते थंड करून बरणीत ठेवा. अश्या प्रकारे तुम्ही ऍपल जॅम तयार करू शकता.