
नवाणी गवतावर चालणे ही एक नैसर्गिक, सोपी आणि अतिशय फायदेशीर कृती आहे, जी शरीर आणि मन दोघांनाही ताजेतवाने करते. खासकरून सकाळच्या वेळेस ओलसर गवतावर चालण्याचे अनेक फायदे आहेत.
-
डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त:
पायांतील काही विशिष्ट बिंदू डोळ्यांशी संबंधित असतात. गवतावर चालल्याने हे बिंदू उत्तेजित होतात आणि डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. -
तनाव व तणावमुक्ती:
निसर्गाच्या संपर्कात आल्यानं मन शांत राहतं. सकाळी थंड गवतावर चालल्याने मानसिक तणाव कमी होतो. -
नैसर्गिक अर्थिंग (Earthing):
जमिनीच्या संपर्कात आल्याने इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा संतुलित होते, ज्यामुळे झोप सुधारते आणि शरीर रिलॅक्स होतं. -
ब्लड सर्क्युलेशन सुधारते:
पायांवर गवताचा सौम्य दाब मिळाल्याने रक्तप्रवाह सुधारतो, आणि ऊर्जेची पातळी वाढते. -
पाचनक्रियेस चालना मिळते:
पायांतील काही बिंदू पचनसंस्थेशी संबंधित असतात. हे बिंदू सक्रिय झाल्याने पचन सुधारते. -
पायांचे व्यायाम होते:
अनवाणी चालण्याने पायातील स्नायूंना व्यायाम मिळतो, पाय मजबूत होतात, आणि थकवा कमी होतो. -
मूड सुधारतो:
निसर्गात वेळ घालवल्याने “सेरोटोनिन” हार्मोन वाढतो, ज्यामुळे मूड फ्रेश आणि सकारात्मक राहतो.
-
शक्यतो सकाळच्या वेळेस गवतावर चालावं – जेव्हा दव असेल आणि प्रदूषण कमी असतं.
-
गवत स्वच्छ आणि रासायनिक खतविरहित असावं.
-
मध्यम वेळ चालणं पुरेसं असतं – 15 ते 30 मिनिटं रोज पुरेसे फायदे देऊ शकतात.